top of page
Writer's pictureDr. Sameer Bhandari

क्लियर अलायनर ट्रीटमेंट घरबसल्या की डेंटिस्ट कडून ?



घरबसल्या जर का कोणाला आपले दात सरळ करून मिळत असतील तर ते कोणाला नको ? हो आणि ते ही कमी कींमतीत!


आज आपल्याकडे वेळेचा देखील आभाव आहे. डेंटिस्ट कडे अपॉईंटमेंट घेऊन जाऊन ट्रीटमेंट करून घेणे हे आपणास कटकटीचे वाटते. वेळ आणि पैसे दोन्ही खर्च होतात आणि कामाचे नुकसान होते ते वेगळेच, बरोबर आहे ना ?


वास्तविक पाहता सर्वांना सरळ, सुंदर दिसणारे दात हवे असतात.कारण असे सुंदर दात आपले व्यक्तिमत्व अधिक खुलवतात आणि आपला आत्मविश्वास द्विगुणित करतात.


वेडेवाकडे दात सरळ करण्यासाठीची प्रचिलीत उपचारपद्धती सर्वांकडून सहजपणे स्वीकारली जात नाही . प्रचिलीत उपचार पद्धतीत दातांवर धातूच्या ब्रॅकेट्स आणि तारांच्या मदतीने दातांना सरळ केले जाते. सहजिकपणे अश्या प्रकारच्या पद्धतीचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेतच .


अश्या प्रकारची उपचार पद्धती वयाने थोड्या मोठ्या असलेल्या व्यक्ति सहजपणे स्वीकारत नाहीत. कारण समाजात वावरताना त्यांना त्यांच्या दातांवर असे धातूचे आवरण आवडत नाही. त्यांना त्याबरोबर येणारे आहाराचे पथ्य देखील पाळणे अवघड वाटते .

अशा वेळी नवीन प्रगत असणाऱ्या क्लियर अलायनर उपचार पद्धतीकडे लोकांचा ओढा वाढला आहे.


डेन्टल अलायनर किंवा क्लियर अलायनर ही वेडेवाकडे दात सरळ करण्याची एक खूपच प्रगत आणि आधुनिक उपचार पद्धती आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीनेच हे शक्य झाले आहे.


पण फक्त तंत्रज्ञानावर विसंबून राहणे जरा धोकादायकच वाटते. कारण फक्त स्कॅन, छायाचित्रे इत्यादि च्या मदतीने आपल्या प्रॉब्लेमचे अचूक निदान करणे कठीण असते. आणि अचूक निदान न करता केलेला उपचार तर त्याहून धोकादायक ठरू शकतो.


कोणतीही आधुनिक उपचारपद्धती अचूक निदान आणि त्यावर आधारित उपचार योजना यांच्या शिवाय होऊच शकत नाही .


जेंव्हा आपण डेंटिस्ट कडे जाऊन ट्रीटमेंट घेता तेंव्हा आपल्या मुख आरोग्याचे पूर्ण पणे परीक्षण करून आपणास योग्य अशी उपचार पद्धती सुचवली जाते.


आपण जेंव्हा घरी येऊन ट्रीटमेंट देण्याऱ्या कंपन्यांकडे पाहतो, तेंव्हा असे दिसते की आपल्या मौखीक आरोग्याचे पूर्ण परीक्षण करणे, अचूक निदान करणे, आणि त्या नुसार आपली ट्रीटमेंट प्लान करणे या महत्वाच्या स्टेप्स दुर्लक्षित होण्याची शक्यता असते. तसेच इन्फेक्शन कंट्रोल प्रोटोकॉल देखील पूर्ण पणे पाळला जाईल अशी शक्यता कमी असते .


कदाचित दिलेला उपचार आपणास आपेक्षित परिणाम देईल याची खात्री ठेवणे देखील कठीण आहे .


लक्षात ठेवा कॉम्प्युटर सिम्युलेशन आणि ट्रीटमेंट या मधला दुआ जर का पक्का नसेल तर त्यावर बांधलेला पूल ढासळण्याची शक्यता अधिक असते .


सांगण्याचे तात्पर्य असे की - नैसर्गिक दात हा आपल्या शरीराचा अमूल्य ठेवा आहे, तेंव्हा थोड्या आरमासाठी आपल्या आरोग्याची जबाबदारी कोणावर सोपवताय याची खात्री करा .



122 views0 comments

Related Posts

See All

Comments


bottom of page